उत्तराखंड दुर्घटना : महाराष्ट्रातील सर्व भाविक सुखरुप : पाटील
उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे जवळपास पंधरा हजार भाविक अडकले आहेत. यात महाराष्ट्रातील 102 भाविकांचा समावेश आहे. हे सर्व भाविक सुखरुप असल्याची माहिती पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मुंबई : उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे जवळपास पंधरा हजार भाविक अडकले आहेत. यात महाराष्ट्रातील 102 भाविकांचा समावेश आहे. हे सर्व भाविक सुखरुप असल्याची माहिती पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
औरंगाबादचे 22, उस्मानाबादचे 09 आणि अहमदनगरचे 26 भाविक असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्व भाविक सुखरुप असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेय. या सर्व भाविकांच्या संपर्कात असल्याचं पाटील यांनी सांगितलंय.
स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सगळ्यांना हॉटेलपर्यंत पोहचवलं असून लवकरच ते महाराष्ट्रात परततील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय. या भाविकांबद्दल अधिक माहितीकरिता त्यांच्या नातेवाईकांनी 02472-225618 / 227301 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.
विष्णूप्रयाग परिसरातील हाथी पर्वत भागात हे भूस्खलन झालंय.. या भागात सुमारे 15 हजार लोक अडक्याची प्राथमिक माहिती मिळतीत आहे. दरम्यान भूस्खलनामुळे रस्त्यांचं मोठं नुकसान झालंय.. दगड मातीचे ढिकारे रस्त्यावर पडल्याने बद्रिनाथकडे जाणारी वाहतूक बंद केली आहे. ही वाहतूक दुपारनंतर पूर्ववत होण्याची शक्यता आहे.