मुंबई : अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स  तर्फे अभियांत्रिकी क्षेत्रातील चार्टर्ड इंजिनिअर हा सर्वोच्च सन्मान विशाल कडणे यांना देण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातील स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग क्षेत्रात संशोधन करत असलेले रिसर्च स्कॉलर विशाल कडणे यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्वोच्च बहुमान असलेला चार्टर्ड इंजिनिअर हा सन्मान प्रदान करण्यात आला. पर्जन्य जल संधारण, कोल्ड रोलड स्टील स्ट्रक्चर, लिक्विफॅक्षन रेसिस्टंस अशा अनेक विषयांवर कडणे गेली १० वर्षे काम करत आहेत. 


इंजिनिअरिंग क्षेत्रातील रिसर्च वर्क आणि पदव्युत्तर शिक्षण आणि दशकाहुन अधिक काळ अभियांत्रिकी क्षेत्रात दिलेले उल्लेखनीय योगदान यामुळे कडणे यांचे गेल्या वर्षी पद्मश्री पुरस्कारासाठी देखील नामांकन झाले होते.


शेतकऱ्यांना अधिकाधिक रेन वॉटर हार्वेस्टिंगचे महत्व पटवून देवून भुधारणा करण्यासाठी गेली अनेक वर्ष त्यांचे प्रयत्न चालू आहेत. मुंबई महानगर पालिका नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनियर व आर्किटेक्ट म्हणून कार्य करत असताना कडणे यांनी १५० हून अधिक धोकादायक इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिट आणि पुढे त्यांच्या पुनर्विकासाकरिता केलेले कार्य उल्लेखनीय आहे.


वास्तुविशारद व वास्तूशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय. अनेक मान्यवरांनी त्यांच्याकडून आपल्या वास्तुचे आराखडे बनवून घेतले आहेत. विशाल कडणे यांना हा सन्मान मिळाल्याने समस्त सिव्हिल इंजिनिअर्स वर्गामध्ये उत्साहाचे वातावरणात आहे.