छगन भुजबळांची प्रकृती बिघडल्यानंतर नेते, मंत्र्याच्या भेटीगाठी
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळांना प्रकृती अत्यवस्थामुळे रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळांना प्रकृती अत्यवस्थामुळे रुग्णालयात हलवण्यात आले आहे. भुजबळांना प्रकृती अत्यवस्थामुळे रुग्णालयात हलवण्यात आल्याने त्यांना भेटायला वेगवेगळे राजकीय नेते गर्दी करू लागले आहेत.
यात ओबीसी गटाचे नेते अधिक असल्याने पुन्हा एकदा ओबीसी नाऱ्याची राजकीय चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, भाजप सरकारमधील मंत्री गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार आदींनी त्यांची भेट घेतली आहे.
मनी लॉड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले भुजबळ सध्या डेंग्यूसदृष्य आजारामुळं जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. दरम्यान, भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. त्यांना MICUमध्ये दाखल करण्यात आले आहे.