समुद्रातील शिवाजी महाराज स्मारकासाठी 3 हजार 600 कोटी
अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा मुद्दा चर्चेत आलाय. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी 3 हजार 600 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे.
मुंबई : अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा मुद्दा चर्चेत आलाय. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी 3 हजार 600 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे.
आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा शिवस्मारकाचा मुद्दा पुढे करण्यात आला आहे. राज्यात नगर परिषद आणि महापालिका निवडणुका जाहीर करण्यात आल्यात. त्यामुळे आचारसंहितेतही निवडणूक आयोगाच्या परवानगीने निधी मंजूर केला जाईल, अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली.
दरम्यान, शिवस्मारकासाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाल्यास टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचे उद्धाटन करण्यात येईल, असे मेटे यांनी सांगितले आहे. या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत होणार आहे. 2019पर्यंत पहिला टप्पा पूर्ण होईल. शिवस्मारक प्रकल्पासाठी लागणार निधी राज्य सरकारकडून दिला जाणार असून, यातील काही प्रमाणात निधी केंद्र सरकारकडून मिळेस, असे ते म्हणालेत.