मुंबई : विधानपरिषदेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धनंजय मुंडेंची जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्त्युतर दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्जमाफीबद्दल सरकार सकारात्मक आहे. ज्यांनी कर्ज फेडलंय, त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी नवी योजना आणत आहोत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. पण विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंनी कर्जमाफी बद्दल सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला. त्यानंतर विरोधकांनी काही काळ गोंधळ घातला. पण कामकाज सुरू ठेवल्याचं चित्र आहे.


तिकडे विधानसभेतही कामकाज सुरू झालंय..पण कामकाजात एकही विरोधी पक्षाचा आमदार उपस्थित नाही. विरोधक आमदारांच्या शिवाय हे कामकाज सुरू आहे. खरंतरं विधानसभेत 19 आमदारांचं निलंबन झाल्यापासूनचं विरोधी पक्षाच्या आमदारांनी कामकाजावर बहिष्कार घातलाय. आज विधानसभेचं कामकाज प्रश्नत्तरांच्या तासानं सुरू झालंय. पण सत्ताधारी आमदारांच्या प्रश्नाला सत्ताधारी मंत्रीच उत्तरं देत आहेत. शिवाय विधानसभेतले बहुतांश आमदार संघर्षयात्रेत सामील झालेत. त्यामुळे विधानसभेत आज शिवसेना आणि भाजपचे आमदारच उपस्थित आहेत.