मुंबई : सध्याची मुंबई महापालिकेची निवडणूक होळीच्या शिमग्यापेक्षा वाईट चालली आहे. दाखवण्यासारखे काही उरले नसल्यामुळं विरोधक काहीही बोलत आहेत. राम मंदिर उभे राहणार आहे, युपीच्या जाहिरनाम्यात आम्ही वचन दिले आहे, असे स्पष्टीकरण देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसनेवर हल्लाबोल चढवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गिरगावकरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिलेले नाही. मराठी माणूस मागासलेला, तहानलेला ठेवण्याचे काम शिवसेनेने केले. आहे. कुलाब्यात, मलबार हिलला २४ तास पाणी मग गिरगावात का नाही, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.


शिवसेना तोंडाला वाटेल ते बोलत आहे. त्यांच्याकडे प्रचारात कोणताही मुद्दा नाही. त्यांनी काहीही केलेले नाही. ते येईल ते बोलत आहे. मेट्रोला विरोध करत आहे. त्यांना मराठी माणसांचे हित नको आहे. आम्ही १२० फुटांच्या ऐवजी ५०० फुटांचे घर त्यांना देणार आहे, त्यांचे कोणतेही नुकसान करणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणालेत.


भाषणातील ठळक बाबी...


- निवडणूक होळीच्या शिमग्यापेक्षा वाईट चाललीय
- दाखवण्यासारखे काही उरले नसल्यामुळं विरोधक काहीही बोलत आहेत
- राम मंदिर उभे राहणार आहे, युपीच्या जाहिरनाम्यात आम्ही वचन दिले आहे
- गिरगावकरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले नाही
- मराठी माणूस मागासलेला, तहानलेला ठेवण्याचे काम सेनेने केले
- कुलाब्यात, मलबार हिलला २४ तास पाणी मग गिरगावात का नाही  - मेटृो भूमिगत आहे. ५०० परिवारांना गिरगावातच नविन घर देणार
- १२० ऐवजी ५०० फूटांचे घर दिले जाईल
- संक्रमण शिबीरही गिरगावजवळच बांधणार


www.24taas.com


 - मुंबई महापालिकेच्या माध्यमातून योग्य विकास आराखडा आणून गिरगावकरांना मोठी घरे देवू
- २४४५ कोटींचे रस्ते एका वर्षात बांधले. या रस्ते कामातील क्रस्ट लेयर गायब झालेत. 
- वारंवार तेच ते रस्ते करून ठेकेदारांना जोपासले गेले, मलई खाण्याचे काम केले
- घामाचा पैसा घोटाळ्यात गेला
- पारदर्शक कामाची मागणी केली, यात चूक काय ?
- नालेसफाईच्या चौकशीतही अनेक चुरस कथा समोर आल्या
- गाळ वाहून नेण्यासाठी बाईकचा वापर केला गेला
- रजनीकांत प्रमाणे एक वाहन एकाच वेळी अनेकदा चालवल्याचे दाखवले
- ७० टक्के कामे झाली नाहीतच
- नालेसफाईतल्या घोटाळ्यामुळं मुंबई बुडाली


दरम्यान, यावेळी आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टिका केली. ते म्हणालेत, राम मंदिर आणि बीएमसी निवडणुकीचा संबंध काय? एका बाजूला थयथयाट तर दुसरीकडं थॉट आहे, एकीकडं विषपुरूष तर दुसरीकडं विकासपुरूष.