मुंबई : तापमानाचा पारा आणि घामाच्या धारांतून मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळालाय. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. राज्यात दोन दिवस काही भागात गारपिट सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्र्ट काही भागात पाऊस आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई परिसरातही दिवसभरात तापमानाचा पारा खाली येईल आणि काही भागात पावसाच्या सरी पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळानं वर्तविली आहे. राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आलाय. आज सकाळी देखील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या.


दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात २४ तासात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार जिल्ह्यातील निलंगा शहर आणि तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. गरमीपासून नागरिकांची काही काळासाठी सुटका झाली. गारांचा खच निलंगा शहरात सर्वत्र दिसून येत होता. या अवकाळी पाऊस आणि गारांमुळे आंब्याचे काही अंशी नुकसान झाले आहे. तर वादळी वाऱ्यामुळे शहरातील काही भागातील पत्रे उडून गेली.