मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाचा धडाका लावलाय.


मेट्रो कारशेडला हिरवा कंदील


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरेमधील 33 हेक्टर जागेवर मेट्रो कारशेड उभारण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला दणका दिलाय. शिवसेनेच्या प्रखर विरोधानंतरही मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलाय. 


आरेमधील 50 टक्क्यांपेक्षा जास्त वृक्षतोड वाचवून आणि तोडलेल्या झाडांच्या एकास तीन झाडे लावून कारडेपो मंजूर करण्याची शिफारस समितीने केली होती. या शिफारशीनंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलाय.


बीडीडी चाळींचा पुनर्विकास


याशिवाय दहिसर कारशेड आणि बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचाही निर्णयही मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. या निर्णयामुळे बीडीडी वासियांना किमान 500 चौ. फूटाचे घर मिळणार आहे. 


हे निर्णय घेऊन शिवस्मारकावरून आधीच दुखावलेल्या शिवसेनेला  मुख्यमंत्र्यांनी आणखी डिवचल्याचं बोललं जातंय. आरे कारडेपो विरोधात शिवसेनेने आंदोलन केले होते. आता मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयानंतर शिवसेना आणि उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडं लक्ष लागलंय.