मुंबई : मुंबईतील म्हाडा वसाहती, संक्रमण शिबिरं, उपनगरातील जुन्या आणि भाडेकरू इमारतींच्या पुनर्विकासाचा आराखडा स्पष्ट करणारं नवं गृहनिर्माण धोरण आज जाहीर करण्यात आलं. या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकाच मंचावर दिसले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप-शिवसेनेनं मुंबईकरांना खूश करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलाय. उपनगरांमध्ये क्लस्टर धोरण लागू करण्याची, जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याची आणि संक्रमक शिबिरांचं पुनर्निर्माण करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. तर गृहनिर्माण धोरण राबवताना मुंबई महापालिकेलाही विचारात घ्या, अशी मागणी करतानाच जागांची नाव बदलणाऱ्या बिल्डरांना उद्धव ठाकरेंनी यावेळी दम भरला.


 


मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस म्हणतात... 


- राज्याचं नवं गृहनिर्माण धोरण व्यापक धोरणाचा एक भाग  - मुख्यमंत्री


- गृहनिर्माण मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार


- धोरणातून मोठ्या प्रश्नाला पूर्णविराम


- २२ हजार इमारतींतील रहिवाशांना फायदा


- क्लस्टर डेव्हलमेंटबद्दल धोरण जाहीर


- क्लस्टर रिडेव्हलमेंट होणार


- उपनगरांतही क्लस्टर रिडेव्हलपमेंट होणार


- सामान्यांच्या हक्काच्या घरासाठी प्रयत्न 


- मुंबईत हक्काचं घर मिळालं पाहिजे


- लालफितीच्या कारभाराचा विकासात अडसर


- केवळ चर्चा करून  मुंबई बदलणार नाही


- गेल्या ८-१० वर्षांत पुनर्विकासाचं काम नाही... अनेक वर्ष निर्णयच घेतले गेले नाहीत


- संक्रमण नियमित करण्याचा निर्णय


- १० वर्षांपासून शिबिरात राहणाऱ्यांना घर


काय म्हणाले उद्धव ठाकरे


- ही योजना मागच्या युती सरकारमध्येच मांडण्यात आली होती


- उद्धव ठाकरेंनी मानले सरकारचे आभार


- सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळणार का?


- सर्वसामान्य माणसाला हक्काचं घर मिळणार का?