मुंबई : शिवसेनेसोबत पारदर्शकतेच्या आधारावर युती करणार असल्याचा पुनरूच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र याचवेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव असल्याचं वक्तव्य केलं. 


मुंबईतल्या पार्लेमधील लोकमान्य सेवा संघतर्फे मॅजेस्टिक गप्पांतर्गत झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकरांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. 


दरम्यान, ग्रामविकास खात्यातील घोटाळ्याचा गौप्यस्फोट झी मीडियानं केला होता. आम्ही दाखवलेल्या बातमीनंतर, ग्रामविकास खात्यात अनियमितता झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी देखील मान्य केलंय.


 मात्र या अनियमिततेमध्ये ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंचा सहभाग नाही, अशी क्लिन चीट देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.