भाऊचा धक्का या ठिकाणी नुतनीकरण केलेल्या प्रवासी धक्क्याचं उद्घाटन
भाऊच्या धक्क्याच्या ठिकाणी असलेल्या नुतनीकरण केलेल्या प्रवासी धक्क्याचं उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत झाले. आता भाऊच्या धक्क्याहुन प्रवास करतांना बोटीची वाट बघण्यासाठी प्रतीक्षालय तसंच खाद्य पदार्थांचे स्टॉल, स्वच्छतागृह सुविधा असणार आहेत.
मुंबई : भाऊच्या धक्क्याच्या ठिकाणी असलेल्या नुतनीकरण केलेल्या प्रवासी धक्क्याचं उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत झाले. आता भाऊच्या धक्क्याहुन प्रवास करतांना बोटीची वाट बघण्यासाठी प्रतीक्षालय तसंच खाद्य पदार्थांचे स्टॉल, स्वच्छतागृह सुविधा असणार आहेत.
लवकरच मुंबईच्या पूर्व किना-यावर नियमित प्रवासी वाहतूक सेवा सुरु होणार आहे. त्यामध्ये चार चाकी हलकी वाहन सुद्धा नेता येणार आहेत. भाऊचा धक्का ते मांडवा आणि नेरुळ अशी सुविधा सुरु होणार आहे. तेव्हा या सेवेसाठीच्या टर्मिनलचे भूमिपूजन यावेळी मुख्यमंत्री आणि गडकरी यांनी यावेळी केले.
हे टर्मिनल 4 एप्रिल 2018 ला प्रवासी वाहतुकीकरता खुले होणार आहे. यामुळे मुंबई ते अलिबाग किंवा रायगड मध्ये पोहचणे ते सुद्धा स्वतःचे वाहन घेत अगदी कमी वेळेत आणि खर्चात शक्य होणार आहे. त्याचबरोबर मुंबई पोर्ट ट्रस्टला येणा-या जहाजांकरता इंधन भरण्यासाठी विविध सुविधांचे भूमिपूजन यावेळी झाले.