मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तीन वाजता भाजप नेत्यांची बैठक बोलावलीय. जागावाटपासाठी शिवसेना भाजप नेत्यांची बैठकीची  कालची तिसरी फेरी निष्फळ ठरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संध्याकाळी मुंबईत आयोजित या बैठकीला शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी तीन नेते उपस्थित होते. मात्र जागावाटपाच्या मुद्द्यावरच ही बैठक अडखळली. भाजपनं निम्म्या म्हणजे 114 जागांची मागणी शिवसेनेसमोर ठेवली. मात्र शिवसेनेनं भाजप पुढ्यात 60 जागांचा प्रस्ताव ठेवला.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  चर्चेवेळी शिवसेनेकडून 71 जागांचा प्रस्ताव आणावा असं ठरलेलं असताना दोन मोठ्य़ा नेत्यांच्या उपस्थितीत रवींद्र मिर्लेकर यांनी 60 जांगाचा प्रस्ताव समोर आणला आणि चर्चेत तणाव निर्माण झाला. 


दोन्ही पक्ष आपल्या मुद्द्यावर ठाम होते. त्यामुळे ही चर्चा पुढे सरकूच शकली नाही. अखेर जागावाटपाचा हा तिढा वरिष्ठ पातळीवरच सोडवला जाईल या मुद्द्यावर दोन्ही गटांचं एकमत झालं. आणि ही बैठक तिथेच संपली.