मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरमधून पडले, असा एक व्हिडिओ एका यूट्यूब चॅनलवर टाकला असून हा फेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 


काय आहे या व्हिडिओमध्ये 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओमध्ये एका हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उभे आहे. मुख्यमंत्रीसारखा पेहराव केला व्यक्ती हेलिकॉप्टरच्या खाली उभा आहे. तो काही तरी बोलून हेलिकॉप्टरपासून दूर जात असताना धडपडतो. तो जमिनीवर लोटांगण घालतो. 


हा व्हिडिओ फार दूर वरून शूट केला आहे. त्यामुळे ती व्यक्ती कोण हे दिसत नाही. त्या व्यक्तीची अंग काठी मुख्यमंत्र्यासारखी आहे. तसेच त्यांनी जॅकेट घातल्याने तो व्यक्ती मुख्यमंत्र्यासारखा दिसतो. 


 


खालील फेक व्हिडिओ होतोय व्हायरल... (हा व्हिडिओ झी २४ तासचा नाही) 



कसा आहे हा फेक व्हिडिओ. 


मुख्यमंत्री सारखा दिसणारा हा व्यक्ती जेव्हा पडतो तेव्हा त्याला उचलायला कोणी येत नाही. तो स्वतः उठून उभा राहतो. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत त्याचे सुरक्षा रक्षक असतात. पण या व्यक्तीसोबत कोणीच दिसत नाही. तसेच खाली पडल्यावर एका बिनधास्त व्यक्ती प्रमाणे हेलिकॉप्टरकडे पाहत तो चालत जातो. त्याच्या मागेपुढे कोणी नसते.  तसेच शेवटी तो एका लाल दिव्याच्या गाडीत बसतो. पण ही गाडी सुरू झाल्यावर तो पळत ती गाडी पकडतो. त्यामुळे हे माननीय मुख्यमंत्री नसून त्यांच्यासारखा दिसणार व्यक्ती होता. 


 


नेमके खरे काय घडले होते...


जेव्हा ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओ मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर जवळ गेले. तेव्हा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसले होते. त्यांनी काही माहिती घेतली. त्याच वेळी हेलिकॉप्टर सुरू झाले. हेलिकॉप्टर सुरू झाल्यावर जवळपास कोणी असून नये असा नियम आहे. त्यामुळे फॅन सुरू झाल्यावर हा व्यक्ती घाबरला आणि तो पळायला लागला आणि त्याचा पाय अडकला आणि तो जमिनीवर कोसळला. नंतर तो उठला आणि आपले कपडे झटकत एका लाल दिव्याच्या गाडीत पळत जाऊन बसला. 


मुख्यमंत्र्यांचा अवमान...


अशा प्रकारचा व्हिडिओ टाकून त्याची खातरजमा न करता viral in india या यू ट्यूब चॅनलने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आणि त्यांच्या पदाचा अवमान केला आहे. त्यामुळे हे यू ट्यूब चॅनल त्वरीत बंद करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.