मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल रात्री ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून रद्द झाल्याची घोषणा केलीये. या निर्णयानंतर अनेक सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोदींचा हा निर्णय स्तुत्य असल्याचे म्हटलेय. ऐतिहासिक निर्णय. मोदींच्या या निर्णयाला हॅट्स ऑफ. मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचे आपण सर्व लोक अभिनंद करुया. या निर्णयामुळे देशाच्या विकासातील सर्वात मोठा अडथळा भ्रष्ट्राचार दूर होणार आहे. देश विकासाच्या दिशेने जातोय. त्यामुळे सामान्य लोकांनी याला पाठिंबा द्यावा, असे फडणवीस म्हणालेत.


तसेच सामान्य लोकांनी घाबरुन जाऊ नये. बेकायदेशीर मार्गाने ज्यांनी पैसा कमावलाय ते या निर्णयामुळे अडचणीत येतील. त्यामुळे सामान्य लोकांनी पॅनिक होऊन जाऊ नये. मुख्यमंत्र्याच्या या निर्णयाला समर्थन देऊया,  असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय.