मुंबई : नेहमी आरोप प्रत्यारोप आणि गंभीर चर्चा घडणाऱ्या विधानसभेत आज मुख्यमंत्र्यांच्या एका किश्श्याने हास्यकल्लोळ झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत त्यांच्या मुंबई लोकलमधीस प्रवासाची आठवण करून दिली. नगर विकास खात्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या लोकल प्रवासाची आठवण जागी केली. 


मुख्यमंत्री म्हणाले, एकदा मी मीरा रोडवरून मुंबईला येत होतो, प्लॅटफॉर्मवर उभा होतो, ट्रेन आली पण ट्रेन थांबायच्या आत भरली. खूप लढाई करून मी ट्रेनमध्ये चढलो.  ट्रेनमध्ये दादरपर्यंत एवढी गर्दी होती की स्वतःचा हात खाजवायला गेलो तर दुसऱ्याच हात खाजवला जाईल इतकी गर्दी होती. हात पाय कुठे होत हे कळत नव्हतं. हा किस्सा ऐकल्यावर संपूर्ण सभागृहात एकच खसखस पिकली.  गंभीर आणि वातावरण तापलेल्या सभागृहात या किश्श्याने काहीसा तणाव निवळला होता. 


पण यातून आता मुंबईकरांची सुटका होईल, आता मेट्रो प्रकल्पावर काम सुरु आहे,असे आश्वासन मुख्यमंत्र्यानी यावेळी दिले.