मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शेतकऱ्यांकडून भाजी विकत घेतली आहे. स्वस्त भाज्यांसाठीच्या आठवडी बाजाराचं मंत्रालयामध्ये आज उद्घाटन झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडून भाजी खरेदी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत पुढच्या दोन ते तीन महिन्यांत स्वस्त भाज्यांसाठीचा आठवडी बाजार 25 ते 30 ठिकाणी सुरू होणार आहे. या बाजारांमध्ये शेतक-याकडून थेट माल विकत घेता येणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांचाही फायदा होणार आहे.


ज्या ज्या ठिकाणी सरकारच्या जागा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी अश्या पद्धतीचे आठवडी बाजार सुरु करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.