मुंबई : राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रात्री ही बैठक बोलावली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे सर्व कॅबिनेट आणि राज्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत. तसंच या बैठकीला केंद्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश उपस्थित राहणार आहेत. राज्यातील पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. 


राज्यातील विविध कामांचा आणि पक्ष रणनितीचा आढावाही यावेळी घेतला जाणार आहे. जिल्हा परिषद आणि महापालिकेची जबाबदारी पालकमंत्र्यांकडे देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.