मुंबई : 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मोबदल्यात 5 कोटींची मदत सैनिक कल्याण निधीला देण्याच्या प्रस्तावाला आपला विरोध असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपट प्रदर्शीत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलेल्या तीन पैकी दोन अटींना आमची सहमती होती मात्र, आर्थीक मदतीला माझा विरोध असल्याचं ते म्हणाले.


मदत ही  ऐच्छिक असावी तडजोडीसाठी नव्हे असं मत मी राज ठाकेरेंकडे व्यक्त केलं होतं. मात्र चित्रपट निर्मात्यांनी 5 कोटींची मदत देण्यास उत्सुक असल्याचं सांगितल्यानं हा तोडगा निघाला. 


शिवाय या प्रकरणाचा तोडगा काढण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी विनंती केल्यानं मी या वादात मध्यस्थी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.