मुख्यमंत्री सभागृहात फिरकले नाहीत, मोदींच्या पावलावर पाऊल
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह सत्ताधारी शिवेसनाही आक्रमक असताना मुख्यमंत्री मात्र पहिल्या आठवड्यात सभागृहाकडे पाठ फिरवली.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह सत्ताधारी शिवेसनाही आक्रमक असताना मुख्यमंत्री मात्र पहिल्या आठवड्यात सभागृहाकडे पाठ फिरवली.
अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली तेव्हा संयुक्त सभागृहात मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यानंतर विधानसभेत शोकप्रस्ताव सादर करण्यात आला तेव्हा शोकप्रस्तावाल हजेरी लावून मुख्यमंत्री विधानसभेतून बाहेर पडले ते त्यानंतर पूर्ण आठवडा ते विधानसभेत फिरकलेच नाहीत.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री वर्षावर बैठकांमध्ये व्यस्त होते, तर तिसऱ्या दिवशी विधानभवनात असूनही ते सभागृहात मात्र आले नाहीत, चौथ्या दिवशी मुख्यमंत्री नागपूरला होते, तर पाचव्या दिवशी ते विधानभवनात होते, मात्र सभागृहात आले नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदीही लोकसभेत जास्त हजर राहत नाहीत, त्याच पावलांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालत असल्याची चर्चा विधिमंडळ आवारात सुरू झाली आहे.
पाच दिवस कुठे होते मुख्यमंत्री....
पहिल्या दिवशी शोकप्रस्तावाला हजेरी
दुसऱ्या दिवशी वर्षावर
तिसऱ्या दिवशी विधानभवनात होते, पण सभागृहात फिरकले नाहीत
चौथ्या दिवशी नागपूर
पाचव्या दिवशी विधानभवनात आहेत मात्र सभागृहात फिरकले नाहीत