मुंबई : एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर राज्य सरकारची डागाळलेली प्रतिमा सुधारण्याच्या दृष्टींन मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केलाय. काल रात्री १ वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर भाजपच्या सगळ्या मंत्र्यांची शाळा घेतली. बैठक संपल्यावर बाहेर पडणाऱ्या मंत्र्यांच्या चेह-यावर उदासिनता स्पष्ट होती.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दीड वर्षाच्या काळात प्रथमच भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे प्रतिमा डागळलीय. 15 वर्षानंतर मेहनत केल्यावर सत्ता आली आणि दीड वर्षाच्या आत ज्येष्ठ मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणानंतर मंत्र्यांनी काय खबरदारी घ्यावी. कार्यालयात कायम येणाऱ्या लोकांबाबत जागरूक असावं अशा सूचनाही देण्यात आली आहे.


खडसे प्रकरणानंतर ज्या चर्चा होत आहेत त्या बाबत संभ्रम निर्माण झाला. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी चित्र स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला शिक्षण मंत्री विनोद तावडे, महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, गृहराज्य मंत्री राम शिंदे, अन्न आणि पुरवठा मंत्री गिरीश बापट, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते.