मुंबई : राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. मराठवाड्यात परभणीचं तापामान थेट  ६.७ अंश सेल्शिअस इतके खाली आले आहे. तर नाशिक जिल्ह्यात निफाडमध्ये तापमान  ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईचे १७ अंश सेल्शिअस आहे. तर नाशिकमध्ये तापामान ८.६ अंश सेल्शिअस तापमान नोंदवण्यात आलंय. धुळ्यात पहाटे पारा १० अंशांवर घसरला होता.  इकडे अहमदनगरमध्ये ८.४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. 


 महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून ओळखले जात असलेले महाबळेश्वरसुद्धा कडाक्याच्या थंडीने गारठलंय. इथे ७.८ अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यातही बोचरी थंडी जाणवत आहे. अमरावती ७.५ अंश सेल्शिअस गेल्या काही दिवसांत राज्यातून थंडी गायब झाली होती. मात्र आता थंडीचा कडाका पुन्हा जाणवू लागला आहे.