मुंबई : कोणताही कार्यक्रम असला की डीजे किंवा लाऊड स्पिकरचा आवाज मोठ्याने लावला जातो. तसेच रात्री अनेकांची झोपमोड होते. मात्र, आता लाऊडस्पिकरवरला रात्री १० ते सकाळी सहा वाजेपर्यंत बंदी करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाऊडस्पिकरवरची ही बंदी मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. राज्य सरकारला आपल्या अधिकारात १२ दिवस रात्री १२ पर्यंत परवानगी देण्याची मुभा हायकोर्टानं दिली आहे.


दरम्यान, परवानगी देताना स्थानिकांच्या मतांचाही विचार करण्याचे निर्देशही न्यायालयाने सरकारला दिले आहेत. तर  जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात दिलेले विशेषाधिकार काढून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कोर्टाने दिला आहे.