मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीत मुंबई काँग्रेस पथनाट्याद्वारे प्रचार आणि प्रसार करणार आहे. महापालिकेत शिवसेना आणि भाजप युतीने गेल्या 22 वर्षात केलेला भ्रष्टाचार, मुंबईकरांच्या समस्या आणि विविध प्रश्नांना या पथनाट्यातून वाचा फोडण्यात येणार आहे.


मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी याबाबतची माहिती दिली आहे. हे पथनाट्य शाहिर साबळे यांचे नातू आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांचे बंधू मंदार शिंदे यांनी तयार केलं आहे. २० जानेवारी ते १९ फेब्रुवारीपर्यंत दररोज मुंबईतील पाच ठिकाणी हे पथनाट्य सादर करण्यात येणार आहे.