मुंबई : पटत नसेल ते बोलून दाखवतो म्हणणाऱ्या नारायण राणेंनी आपल्याच पक्षावर टीका करत 'काँग्रेसची वाटचाल अधोगतीकडे' होत असल्याचं म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसमध्ये तळागाळातल्या कार्यकर्त्यांना कुणीही सांभाळत नाही... लोकसभा आणि विधानसभेतल्या पराभवानंतरही अजून काँग्रेस नेते थंडच आहेत... त्यामुळे आमचे नेते जनतेपर्यंत पोहचू शकले नाहीत, असं राणेंनी झी 24 तासच्या 'रोखठोक' या कार्यक्रमात म्हटलंय. 


आपण राहुल गांधी किंवा सोनिया गांधींवर नाराज नाही तर राज्यातील काही नेत्यांवर नाराज असल्याचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय.  
 
पक्षानं आपला योग्य फायदा करून घेतला नाही, अशी खंतही नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यातले कर्तव्यशून्य काँग्रेस नेत्यांनी केवळ आपला वैयक्तिक फायदा पाहिला.


भाजपवरच्या टीकेवर राणेंचं प्रत्यूत्तर...


'पैसे देऊन भाजपनं सत्ता मिळवली असं म्हणतात... पण, काँग्रेसचीही 15 वर्ष सत्ता होती... ते लोकांना 15 रुपयांचा झेंडा देऊ शकले नाहीत का? कार्यकर्त्यांना निवडणूक साधनं का पुरवली गेली नाहीत? असा परखड सवाल करत नारायण राणेंनी आपल्याच पक्षावर प्रहार केलाय.