मुंबई : काँग्रेसचे विलेपार्लेचे आमदार कृष्णा हेगडे हे भाजपमध्ये सामिल झाले आहेत. हा मुंबई महापालिका निवडणुकीआधी काँग्रेससाठी मोठा धक्का असल्याचं सांगण्यात येत आहे. कारण आमदार कृष्णा हेगडे हे मुंबईतील काँग्रेस आमदारांमधील एक दिग्गज नेते समजले जात होते.


कृष्णा हेगडे यांनी रविवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना, भाजपने पक्षात जोरदार इनकमिंग स्पीड वाढवला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.