मुंबई : मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचं वजन वाढतंच चाललंय. शुक्रवारी रात्री उशिरा आणखी एका अपक्ष नगरसेवकानं शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवनिर्वाचित अपक्ष नगरसेवक किरण लांडगेंचा सेनेला पाठिंबा दर्शविलाय. वॉर्ड क्रमांक 160 मधून ते निवडून आलेत. लांडगे यांच्या पाठिंब्यानंतर सेनेचं संख्याबळ आता 88 वर पोहचलंय. 


किरण लांडगे हे सेनेला पाठिंबा दर्शवणारे चौथे नगरसेवक ठरलेत. याआधी आज दिवसभरात चंगेज मुलतानी, स्नेहल मोरे आणि तुळशीराम शिंदे यांनी सेनेला पाठिंबा दिणार असल्याचं जाहीर केलंय. 


काँग्रेसनंही सेनेला 'सशर्त' पाठिंब्याची तयारी दर्शवलीय. दरम्यान, पालिकेत सत्ता स्थापनेबाबत शनिवारी शिवसेना भवन येथे दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलीय.