मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं जलपूजन तसंच मुंबईतल्या वेगवेगळ्या विकासकामांचा शुभारंभ केला. यानंतर बीकेसीमध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये पंतप्रधानांनी बेईमानांना पुन्हा एकदा इशारा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

50 दिवसानंतर इमानदार लोकांचा त्रास कमी होईल आणि बेईमानांचा त्रास वाढेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. काही लोकांना वाटले बँकांना पटवले तर काळे पैसे पांढरे होतील, पण ते मेले आणि बॅंकवालेही मेले, असा टोलाही मोदींनी लगावला आहे.


तुम्ही मोदीला घाबरत नसाल, केंद्र सरकारला घाबरत नसाल पण 125 कोटी जनतेला कमी लेखू नका, त्यांना तुम्हाला घाबरावच लागेल, असं वक्तव्यही मोदींनी केलं आहे. तसंच ही लढाई आम्ही जिंकत नाही तोपर्यंत ती सुरुच राहील असा इशाराही त्यांनी दिला.