मुंबई : कुर्ला स्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. जलद मार्गावरील सेवा धिम्या मार्गावर वळविण्यात आल्याने लोकल वाहतूक उशिराने सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जलद मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात आल्याने याचा फटका प्रवाशांना बसला. सीएसटीकडे जाणाऱ्या अनेक लोकल कुर्ला ते घाटकोपर दरम्यान रखडल्याने कार्यालयात जाणाऱ्यांना आता लेट मार्कचा सामना करावा लागणार  आहे.


दरम्यान, या विस्कळीत रेल्वेमुळे कुर्ला स्थानकात प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्यांचेही वेळापत्रक कोलमडले आहे. मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अनेक गाड्या उशिराने धावत आहेत.