मुंबई : दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सला मुलगा झाला आहे. मुंबई इंडियन्सनं हैदराबादच्या रणांगणात आयपीएलच्या विजेतेपद मिळवलं. या यानंतर  टीमचा फिल्डिंग कोच जॉन्टी ऱ्होड्सला आनंदाची बातमी देण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉन्टीने आपल्या लेकाचं नाव नाथन ठेवलं आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएलची ट्रॉफी उंचावण्यापूर्वी जॉन्टीने केलेल्या ट्वीटमध्ये 'बक्षिसापूर्वीचं बक्षिस' असं म्हटलं होतं.


दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू जॉन्टी, पत्नी मेलानी यांना रविवारी पुत्ररत्नाचा लाभ झाला. मुंबईतल्या सांताक्रुझच्या एका रुग्णालयात मेलानी हिनं मुलाला जन्म दिला. जॉन्टीनं आपण पुन्हा बाबा झाल्याची माहिती सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांना दिली.


बाळाचं वजन ३.७ किलो असून बाळ आणि आई सुखरुप आहेत. सूर्या हॉस्पिटलमध्ये डॉ. अमित धुरंधर यांनी वॉटर डिलीव्हरी केली. ऱ्होड्स दाम्पत्याचं हे दुसरं अपत्य आहे. 


दोन वर्षांपूर्वी त्यांच्या मुलीचा जन्मही सांताक्रुझच्या सूर्या हॉस्पिटलमध्येच झाला होता. जॉन्टीनं तिचं नाव इंडिया ठेवलं होतं, आपला भारताविषयीचा आदर व्यक्त केला होता. काहीच दिवसांपूर्वी इंडियाचा दुसरा वाढदिवस झाला.