मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पावर टीका होऊ लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाची तोंड भरून स्तुती केली तर  शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी अर्थसंकल्पावर टीका केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही कर्जमुक्तीची मागणी केली होती, ती पूर्ण झाली नसल्याचं सांगत कृषीक्षेत्रासाठीची तरतूद हा आकड्यांचा खेळ असू शकतो, असं मत शिवसेना आमदारांनी व्यक्त केलंय.


 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अर्थसंकल्पाची तोंड भरून स्तुती केली असून शेतकरी आणि विदर्भ मराठवाड्यातल्या उद्योगांना संजीवनी देणारा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं आहे. तर अर्थमंत्र्यांनी केवळ बड्या घोषणा केल्या असून शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नसल्याची टीका माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सांगितलंय.


यंदाचा अर्थसंकल्प शेती क्षेत्राला चालना देणारा आहे असं मत उद्योग जगताने व्यक्त केलंय. मात्र केवळ विदर्भ, मराठवाड्याला देण्यात आलेल्या वीज सवलतीबाबत मात्र पुण्यातील उद्योजकांनी नाराजी दर्शवली आहे. 


दरम्यान, अर्थसंकल्प हा निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे तर जनतेची मनं जिंकण्यासाठी असतो, असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलंय. अर्थसंकल्प मांडल्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्वप्रथम झी मीडियाला प्रतिक्रिया दिली.