मुंबई : येथील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या आवारात शिवाजी महाराजांचा आदर म्हणून त्यांच्या सात किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारण्यात येणार आहेत. तसेच शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळ्याची स्थापना येथे करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील जे. जे. कला महाविद्यालयाने यासंबंधिचा एक आराखडा मध्य रेल्वेला दिला होता. मध्य रेल्वेने तो रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे तो मंजुरीसाठी पाठवला, असे 'मिड डे'ने वृत्त दिलेय. यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद येत्या रेल्वे अर्थसंकल्पात केली जाण्याची शक्यता आहे.


रायगड, पन्हाळा, सिंहगड, शिवनेरी, राजगड, भुळकोट आणि जंजीरा या सात किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या जातील. प्लॅटफॉर्म क्रमांक १८ आणि पी. डिमेलो रस्ता यांच्या दरम्यानच्या जागेत हे स्मारक तयार केले जाईल.


छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकाची इमारत आणि परिसर जागतिक वारसा स्थळ असल्याने या नव्या बांधकामाच्या उंचीवर मर्यादा येणार आहेत. तरी या किल्ल्यांच्या प्रतिकृती साधारण ३० मीटर उंच असणार आहेत. त्यातील शिवनेरी किल्ल्याची उंची सर्वाधिक असेल. त्यात लाईट्स आणि साऊंड शोचे आयोजनही केले जाणार आहे.