दहीहंडीचा वाद `कृष्ण`कुंजवर, समन्वय समिती राज ठाकरेंच्या भेटीला
दहीहंडीच्या उत्सावावर सर्वोच्च न्यायालयानं निर्णयामुळे मुंबई आणि परिसरातल्या दहीहंडी मंडळामध्ये कमालीचं चिंतेचं वातावरण आहे.
मुंबई : दहीहंडीच्या उत्सावावर सर्वोच्च न्यायालयानं निर्णयामुळे मुंबई आणि परिसरातल्या दहीहंडी मंडळामध्ये कमालीचं चिंतेचं वातावरण आहे. दहीहंडी समन्वय समितीच्या सदस्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली.
बैठक सकारात्मक झाल्याचं मंडळांचं म्हणणं आहे. नियम पाळून उत्सव साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. 18 ऑक्टोबरला महाराष्ट्र शासन सुप्रीम कोर्टात भूमिका मांडणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.
मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर समन्वय समिती सदस्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटायला गेले आहेत. काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंनी दही हंडीच्या निर्णयाबाबत अनेक सवाल उपस्थित केले होते.
दहीहंडीची मर्यादा 20 फुटावर आणली, आता काय स्टुलावरुन हंडी फोडायची का? मराठी सण असले की निर्णय घेतले जातात. अन्य सणांसाठी मुभा का? असे प्रश्न राज ठाकरेंनी विचारले होते.