मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीवर घातलेल्या निर्बंधावर नाराज असलेल्या दहीहंडी समन्वय समितीने शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी तुम्ही नियमांचे पाळा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. मात्र, निर्णयाविरोधात अपिल करण्यास नकार दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्याच्या या निर्णयामुळे दहीहंडी समन्वय समितीची निराशा झाली आहे. 18 ऑक्टोबरच्या सुनावणीवेळी महाधिवक्त्यांना न्यायालयात महाराष्ट्राची बाजू मांडण्याची विनंती करु, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले असले तरी ठोस काहीही सांगितलेले नाही.


सर्वोच्च न्यायालयाने 18 वर्षांखालील मुलांना बंदी घातली आहे. तसेच दहीहंडींची कमाल उंची 20 फुटांपेक्षा जास्त नसावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याला आव्हान देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.