दाऊद फोन कॉल वाद : खडसेंवर आरोप लावणाऱ्या हॅकरच्या परिवाराला धमकी
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या कथित संपर्काचा दावा करणारा हॅकर मनीष भंगाळे भूमिगत झाले आहेत.
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या कथित संपर्काचा दावा करणारा हॅकर मनीष भंगाळे भूमिगत झाले आहेत.
कुठे राहतात भंगाळे
जळगावच्या या स्थानिक हॅकरला स्थानिक भाजप समर्थकांनी कथितपणे धमकावले आहे. २७ वर्षीय भंगाळे वडोदरा येथे राहतात. पण त्याचे कुटुंबिय जळगावमध्ये स्थायिक आहेत. रविवारी त्यांनी सांगितले की, भाजपचे लोकांनी माझ्या काका-काकूंना धमकावले. या प्रकरणाचे गंभीर परिणाम भोगावे लागेल.
भंगाळे कोणाकडे मागितली सुरक्षा
भंगाळे आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठी कोर्टाला शरण गेले आहेत. पण खडसेंनी या प्रकरणाचा इन्कार केला आहे. भंगाळेंच्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारची धमकी देण्यात आली नाही आहे, असे खडसेंनी सांगितले आहे.
धमकीबाबत काय म्हणाले खडसे
खडसे म्हणाले, की आम्हांला हे देखील माहिती नाही की भंगाळे कोण आहे. भंगाळेंनी आरोप लावला होता की दाऊदच्या कराचीच्या घरातून खडसे आणि इतर चार जणांना फोन करण्यात आला होता.
कोणी साइट हॅक केली भंगाळेंनी...
त्यांनी दावा केला काही भारताच्या सुरक्षा यंत्रणांच्या मदतीसाठी पाकिस्तानी टेलीकम्युनिकेशन कंपनी लिमिटेडची वेबसाइट हॅक केली होती या दरम्यान खडसे आणि दाऊदचा संपर्क झाला होता. भंगाळे यांनी दावा केला की दाऊदच्या घरातून करण्यात आलेल्या फोन कॉल्सच्या लिस्टमध्ये खडसेंचा नंबर सापडला.
काय म्हणतात मुंबई पोलीस...
खडसेंनी या आरोपांचा इन्कार केला होता आणि मुंबई पोलिसांनीही सांगितले की खडसेंविरूद्ध कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. भंगाळे यांनी मुंबई हायकोर्टात खडसेंविरोधात सीबीआय चौकशीची मागणीची याचिका दाखल केली आहे.