मुंबई : माझ्यावर संजय निरुपम यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे होते. त्या संदर्भात मी संजय निरुपम यांच्या विरोधात अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे. 10 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार. 15 दिवसांच्या आत उत्तर नाही दिले तर क्रिमिनल स्वरूपाची केस फाइल करणार. संजय निरुपम यांनी 15 दिवसात माझी जाहीर माफी मागावी अन्यथा या कारवाईला तयार रहावं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरे कॉलनी मधील 20 एकर जागा हडपली, तिथे अनधिकृत बांधकाम केलं. तसेच स्वतःच्या ऐश्वर्या हाईट या कन्स्ट्रक्शन कंपनीला पदाचा गैरवापर
करून SRA ची काम दिली असे आरोप संजय निरुपम यांनी केले होते.


सर्व संबंधित पेपर मी मुख्यमंत्री यांना दाखवले आहेत. हे पेपर बरोबर असल्याचं मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे.