मुंबई : राज्यातील महापालिका  आणि जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत पराभवनंतर आता आत्मचिंतनासाठी काँग्रेसचीही बैठक घेण्यात येणार आहे. दुपारी चार वाजता गांधी भवनात ही बैठक होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीला दिग्गज उपस्थित राहणार आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही बैठक बोलावलीय. माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते पतंगराव कदम या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. 


राज्यात काँग्रेसला निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. तसेच काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे जोरदार फटका बसला आहे. तसेच मीडियासमोर आपल्याच नेत्यांवर वादग्रस्त टीका करण्यात येते. तर पक्ष श्रेष्ठी लक्ष देत नसल्याने पदाधिकारी आरोप-प्रत्यारोप करतात, याचा परिणाम हा काँग्रेसवर होत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर बैठक होत आहे.


दरम्यान, मुंबईत पक्षात चांगले नसल्याने महापालिकेत दणक बसला. त्यामुळे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी पदाचा राजीनामा दिला. याबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.