मुंबई : 'चला बोलू या, नैराश्य टाळू या' या शिर्षकाखाली जागतीक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण हॉल येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य मंत्री दिपक सावंत, आमदार राहुल नार्वेकर, आमदार राज पुरोहित उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरासह राज्यातही डिप्रेशन म्हणजे नैराश्य ग्रस्त नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची खंत यावेळी कार्यक्रमात सर्वच मान्यवरांनी व्यक्त केली. कारण जगात भारतातील सर्वात जास्त तरुण हे नैराश्यग्रस्त आहेत, असं डब्लूएचओनं जाहीर केलेल्या अहवालात स्पष्ट झालंय. या नैराश्याच्या भस्मासुराला मात देण्यासाठी काय केले पाहिजे याकरता याकार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी तयार केलेली 'कासव' ही शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली.


कौटुंबिक संवाद वाढवा - मुख्यमंत्री


लहान मुलांना पालक सुरक्षित वातावरणात वाढवतात. यामुळे मात्र हसणं, बोलणं, भांडणं, रडणं यांसारख्या सहज भावनांपासून लांब राहतात आणि जेव्हा खुल्या वातावरणात आपली मुलं जातात तेव्हा ते गडबडतात... त्यामुळे मुलांना खुल्या वातावरणात सोडा... रोज परिवारातील सर्व व्यक्तींनी किमान ५ मिनिटे तरी एकमेकांशी बोला... आज संवाद फक्त सोशल मीडियावर होतोय पण प्रत्यक्षात मात्र संवाद केला जात नाही त्यामुळे नैराश्याचे प्रमाण वाढत चाललंय, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.


औषधं मोफत देण्याची मागणी


तसंच 'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिप्रेशन नैराश्य त्यांचे व्यक्त केलेले विचारदेखील कार्यक्रमात दाखवण्यात आले. नैराश्यग्रस्त लोकांना बरे होण्याकरता जी औषधं आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असून अनेक औषध कंपण्यांनी ही औषधे मोफत द्यावी, असं आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री दिपक सावंत यांनी केलं. तसंच मनोरुग्णालयाची अवस्था बिकट असून ते चैतन्यपूर्ण कसे करता येईल याकरता मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी विनंतीही त्यांनी केली. व फ्रीडायग्नोस्टीक, इंद्रधनुष्य योजना ज्या योजनांमुळे ६ कोटी बाह्य रुग्णांना, ७ कोटी अंतर्गत रुग्णांना तर ७ लाख बाळांतिणींना या योजनेचा फायदा होणार आहे. या योजनेचं तसंच यावेळी ग्रामीण भागातील रुग्णालयांना उपयुक्त असणारे स्टँडर्ड प्रोटोकॉल्स या पुस्तिकेचं उद्घाटन करण्यात आलं.