मुंबई : मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेसोबत युती करायची का नाही याबाबतची बैठक संपली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. शिवसेनेबरोबर युती करायची का नाही याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया या बैठकीनंतर भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीमध्ये महापालिकेचा जाहीरनामा आणि पारदर्शकतेवर चर्चा झाल्याचंही आशिष शेलार म्हणालेत. शिवसेना भाजपचा अपमान करत असल्याची नाराजी भाजप आमदारांनी बोलून दाखवल्याची प्रतिक्रिया शेलार यांनी दिली.


संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मात्र आशिष शेलार यांनी टोला लगावला आहे. संजय राऊत हे भाजपसाठी अदखलपात्र आहेत, असा चिमटा शेलार यांनी काढला. भाजपची ताकद बघता त्यांना 60 जागाही जास्त असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं.