झोपडपट्यांवरील कारवाईवरुन मुंबई मनपात सेना-भाजप वाद पेटला
शिवसेना भाजप यांच्यात मुंबई महानगरपालिकेत चांगलाच वाद पेटला. मुंबई महानगपालिकेत माफिया राज असल्याचा आरोप केला जातो आहे. त्याबाबतचं नेमकं सत्य आयुक्तांनी मुंबईकरांसमोर ठेवावं अशा मागणीचं पत्र महापौरांनी आयुक्तांना लिहिलं आहे. तर शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सुनील प्रभू यांनी स्वतः महापालिकेत येऊन झोपडपट्ट्यांवरील कारवाईवरून आयुक्तांची खरडपट्टी काढली.
मुंबई : शिवसेना भाजप यांच्यात मुंबई महानगरपालिकेत चांगलाच वाद पेटला. मुंबई महानगपालिकेत माफिया राज असल्याचा आरोप केला जातो आहे. त्याबाबतचं नेमकं सत्य आयुक्तांनी मुंबईकरांसमोर ठेवावं अशा मागणीचं पत्र महापौरांनी आयुक्तांना लिहिलं आहे. तर शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सुनील प्रभू यांनी स्वतः महापालिकेत येऊन झोपडपट्ट्यांवरील कारवाईवरून आयुक्तांची खरडपट्टी काढली.
14 फुट उंचीपेक्षा जास्त उंचीच्या झोपड्यांवर होणारी कारवाई ही फक्त भाजपची राजकीय चाल असल्याचा आरोप शेवाळे यांनी केला. निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेची कोंडी करण्यासाठी तसंच जनमानसात सेनेला बदनाम करण्यासाठी जाणिवपूर्वक ही कारवाई केली जातेय. ही कारवाई त्वरीत थांबवावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली गेली आहे.