मुंबई : बेळगावात जाणारच असा निर्धार करुन बेळगावला निघालेले दिवाकर रावते परत फिरलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी दिवाकर रावते बेळगावकडे निघाले होते. बुधवारी रात्री बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिवाकर रावते आणि दीपक सावंत या शिवसेना नेत्यांना बेळगावात यायला बंदी घातली होती. ती झुगारुन लावत बेळगावला जाणारच, उद्धव ठाकरेंचा आदेश पाळणारच म्हणत दिवाकर रावते बेळगावला निघाले होते. 


पण, कगनोळी टोलनाक्यावर पोलिसांनी रावतेंना अडवलं आणि त्यांना नोटीस दिली... त्यानंतर हा कर्नाटक सरकारचा निर्णय आहे, असं म्हणत रावते माघारी फिरलेत.


'जय महाराष्ट्र' म्हणणाऱ्यांच्या विरोधात कर्नाटक सरकारचे राज्यमंत्री रोशन बेग यांनी फतवा काढला होता. या फतव्याच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या मोर्चामध्ये शिवसेना नेते सहभागी होणार होते. पण आता ते परत फिरलेत.