मुंबई : पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा अशी मागणी करत मन की बातसोबत गन की बातही करा असा खोचक सल्ला वजा टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल्या समस्या आणि त्याच्यावरील उपाययोजना यासंदर्भात शिवसेनेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. शिवसेना नगरसेवकांचा प्रशिक्षण वर्ग शिवसेनेतर्फे रंगशारदा येथे आयोजित करण्यात आला.


मुंबईतील विकास आराखडा, झोपडपट्ट्यांचा विकास आणि शिवसेनेचा वचननामा यासंदर्भात मार्गदर्शन उद्धव ठाकरे आणि आयुक्त अजॉय मेहता यांनी मार्गदर्शन केलं.