मुंबई : मेट्रो दरवाढीबाबत १२ एप्रिलला मुंबई उच्च न्यायालय घेणार निर्णय आहे. तोवर दरवाढ न करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. mmrda आणि रिलायन्सने चुकीची माहिती दिल्याने न्यायालयाचे ताशेरे ओढले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई मेट्रो रेल तिकीट दरवाढीबाबत येत्या १२ एप्रिलला मुंबई उच्च न्यायालय अंतिम निकाल देणार आहे. तोपर्यंत मेट्रो ट्रेन भाडेवाढ न करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिलं. MMRDA आणि रिलायन्सनं सुप्रीम कोर्टात चुकीची माहिती दिल्यानं हायकोर्टानं यावेळी ताशेरेही ओढले.


तिकीट दरवाढीबाबत हायकोर्टानं २९ जानेवारीला सुनावणी ठेवली होती. तोपर्यंत दर वाढवू नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते. पण MMRDA आणि रिलायन्सला मेट्रो तिकीट दरवाढ करताच येणार नाही, असा आदेश उच्च न्यायालयानं दिलाय. असं MMRDA आणि रिलायन्सनं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं, अशी चुकीची माहिती दिल्याने मुंबई उच्च नायालयानं संताप व्यक्त केला.