`पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा देऊ नका`
पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा देऊ नका अशी मागणी भाजपचे आमदार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे.
मुंबई : पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा देऊ नका अशी मागणी भाजपचे आमदार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. याबाबतचं निवेदन आशिष शेलार यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना दिलं आहे.
थिएटर ओनर्स असोसिएशनन पाकिस्तानी कलाकारांना काम देऊ नये अशी मागणी केली, त्याचंही शेलार यांनी स्वागत केलं आहे. दरम्यान करण जोहर दिग्दर्शित 'ए दिल है मुश्किल' आणि शाहरुखच्या 'रईस' सिनेमाच्या अडचणींत वाढ झाली आहे.
सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्स मालकांच्या असोसिएशननं या सिनेमासाठी स्क्रिन उपलब्ध करून देण्यास स्पष्ट नकार दिलाय. गुजरात, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमधले सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्सचे अनेक मालक या असोसिएशनचे सदस्य आहेत.