मुंबई : दादर येथील आंबेडकर भवनाची इमारत पाडल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेल्या सहा जणांना शुक्रवारी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केलाआहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान या सहाजणांना पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 


ट्रस्टचे पदाधिकारी नागसेन सोनारे, श्रीकांत गवारे, अभय बंबोले, उत्तमराव बोधवडे, विजय रणपिसे आणि रत्नेंद्र शिंदे या सहाजणांचा यात समावेश आहे.  या अटकपूर्व जामिनाला विरोध करण्यासाठी तीन अर्ज करण्यात आले होत. 


यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू आनंदराज आंबेडकर यांचाही अर्ज होता. तथापी सर्व मुद्दे लक्षात घेऊन न्यायालयाने या सहा आरोपींना सशर्त अटकपूर्वी जामीन मंजूर केला आहे.