मुंबई : प्रत्येक घरात फ्रिजचं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं, थंडगार वाटत असलं तरी या पाण्यामुळे अनेक रोग आपल्या शरीरावर 'अधिराज्य' गाजवतात, फ्रिजच्या पाण्याचं हे थंडगार वाटत असलं तरी एका अर्थाने घातक संस्थान खालसा करायचं असेल तर कोमट पाण्याशिवाय पर्याय नाही, कोमट किंवा साधे पाणी पिल्याने काय फायदे वाचा थोडक्यात...


वजन झटपट कमी होतं,  मध आणि लिंबू मिसळून घेतलं तर ३ महिन्यात फरक
कोमट किंवा साधे पाणी पिण्याची सवय केल्यास वजन कमी करण्यास मोठी मदत होते.
नेहमी कोमट पाणी पिल्याने कधीच सर्दी होत नाही, घसाही बरा होतो, घशाला संक्रमण होत नाही.
वाढत्या वयाने चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या येतात त्या लवकर येत नाहीत. कोमट पाण्याने त्वचा तेजस्वी राहते.
शरीर मांसपेशी ८० टक्क्याने बनली आहे, कोमट पाण्याने हातपाय, घुडघे दुखी दूर ठेवता येते.
मासिक पाळीत कोमट पाणी पिल्यास, दुखण्याच्या त्रासापासून मुक्तता मिळते.
मासिक पाळीत कोमट पाण्यानं पोट शेकल्यास मोठा दिलासा मिळतो.
कोमट पाण्याने शरीराचं तापमान वाढून घाम येतो, अशुद्धता बाहेर पडते.
कोमट पाण्याने त्वचा तजेलदार आणि केसांची निरोगी वाढ होते.