मुंबई : शाळकरी विद्यार्थी आणि महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांना ड्रग्जच्या नशेत ओढणा-या ड्रग्ज माफियांचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना ड्रग्सच्या नशेत खेचण्यासाठी ड्रग्ज माफियांनी वेगळीच शक्कल लढवली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ड्रग्स माफिया लव ड्रॉप किंवा लव सिप या नावाच्या ड्रग्जने या विद्यार्थ्यांना नशेत खेचत होते. सुरुवातीला त्यांना नशा करण्याची सवय या माफियांकडून लावली जात असे. 


चॉकलेटच्या रॅपरमध्ये नाममात्र ड्रग्जआणि कोकेन टाकून ते विद्यार्थ्यांमध्ये मोफत वितरित करायचे. एकदा त्यांना नशेची सवय लागली की प्रति दहा ग्राम ड्रग्जसाठी हे ड्रग्स माफिया त्यांच्याकडून दोन हजार ते पाच हजार रुपये उकळत असत. 


या पोलिसांना ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी २ नायजेरियन व्यक्तींना अटक केलीय. पोलिसांनी त्यांच्याकडून 115 ग्रँम कोकेन आणि 60 ग्रँम मेफेड्रोन जप्त केलंय. या ड्रग्जची किंमत बाजारात 8 लाख रुपये इतकी असल्याचं सांगितलं जातंय.