महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
आज मुंबईसह राज्यातल्या 10 महापालिकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा अखरेचा दिवस आहे. बंडखोरी टाळण्यासाठी सगळ्याच पक्षांची धडपड सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेवटच्या क्षणी थेट एबी फॉर्म देणार असल्याचं समजतंय.
मुंबई : आज मुंबईसह राज्यातल्या 10 महापालिकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा अखरेचा दिवस आहे. बंडखोरी टाळण्यासाठी सगळ्याच पक्षांची धडपड सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेवटच्या क्षणी थेट एबी फॉर्म देणार असल्याचं समजतंय.
शेवटचा दिवस असल्यानं संपूर्ण राज्यात आज इच्छुकांची एकच धावाधाव बघायाला मिळतेय. ज्यांना पक्षांची अधिकृत तिकीटं मिळाली आहेत. त्यांना दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
अनेक पक्षांनी आपापल्या उमेदवारांना आज थेट एबी फॉर्म देऊन बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न केलाय. पण बंडखोरी थांबवताना पक्ष श्रेष्ठींच्या नाकी नऊ येणार आहेत.
मुंबई महापालिकेसाठी भाजपनं काल रात्री उशिरा 195 जणांची यादी जाहीर केली. पुण्यातही 139 उमेदवारांची यादी जाहीर झालीय.