मुंबई : महापालिका आणि जिल्हा परिषदेत भाजपसोबत जाण्याची इच्छा आहे, युती झाली नाही तर स्वबळावर लढणार, अशी घोषणा राज्य मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी गेली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही भाजपसोबत सत्ते आहोत. मात्र, युती झाली तर ठिक नाहीतर महापालिका, जिल्हा परिषदेत सर्वच जागा लढवणार, असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपचे मित्र पक्ष जानकर यांच्या या नव्या घोषणेमुळे युती झाली तर त्यांच्या पदरात भाजप किती जागा देणार याचे गणित आहे. तसेच युती झाली नाही तर सर्व जागा लढविण्याची घोषणा केल्याने भाजपला हा इशारा असल्याचे दिसत आहे.


ठळक बाबी


- महापालिका आणि जिल्हा परिषदेत भाजपसोबत जाण्याची इच्छा आहे.

- युती झाली नाही तर स्वबळावर लढणार

- महापालिका, जिल्हा परिषदेत सर्वच जागा लढवणार

- उत्तर प्रदेशात ९१ जागा लढवणार 

- उत्तराखंड मध्ये ४० जागा लढवणार 

- उत्तर प्रदेशात चांगला प्रतिसाद आहे.

- उत्तराखंड मध्ये बासुरी चिन्ह मिळाले आहे.

- महाराष्ट्रात दोन्ही निवडणूकीत कप बशी चिन्ह असेल.

दरम्यान, शिवसेना-भाजप युतीचे तळ्यात मळ्यात आहे. १५ जानेवारीनंतर युतीबाबत बोलणी होणार आहेत. मात्र, भाजपने पारदर्शकतेचा नारा दिलाय. पक्ष कायकर्त्यांनी एकला चलोचा नारा दिलाय. कोणाच्या कुबड्या नको असे स्पष्ट केलेय. त्यामुळे शिवसेनेसोबत युती होणार का, याचीच चर्चा आहे. 


तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीचे संकेत दिले आहेत. मात्र, पारदर्शकतेच्या तत्वावर युती होईल असे म्हटले आहे. त्याचवेळी काँग्रेसला संधी मिळू नये, याची भाजपला भीती आहे. त्यामुळे भाजप युतीसाठी तयार आहे. मात्र, सेनेच्या गोठ्यातूनही युतीसाठी पदाधिकारी आग्रही नाहीत. त्यांनीही स्वबळाचा नारा दिलाय. त्यामुळे जानकरांची भूमिका भाजपसाठी जड जाण्याची शक्यता आहे.