मुंबई : निवडणूक आयोगाने राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि १० महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला, मात्र यात काही महत्वाचे मुद्दे देखील होते, तेव्हा पाहा निवडणूक आयोगाने कोणते महत्वाचे मुद्दे यावेळी सांगितले, काय सुधारणात्मक बदल केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१) २५ जिल्हा परिषदा, १० महापालिकांसाठी आजपासून आदर्श आचार संहिता लागू 


२) महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी विकास कार्यक्रम जाहीर करणे, अथवा राबवणे थांबणार


३) जनमत चाचणी (एक्झिट पोल) घेण्यावर १४ फेब्रुवारीपासून बंदी


४) निवडणुकीचा हिशेब ठेवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला बँक खाते उघडणे बंधनरकारक 


५)  खर्चाचा हिशेब निवडणूक झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत निवडणूक आयोगाकडे जमा करावा


६)  बँक, एनजीओ, कॉर्पोरेट कंपनी अशा सर्व माध्यमातून मतदान करण्याचा प्रसार करणार, महापालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी होते, ती सुधारण्याचा प्रयत्न करणार


७)  महापालिका निवडणुकीसाठी १९ फेब्रुवारी संध्याकाळी साडेपाचपासून प्रचार करण्यास बंदी


८)  मतदान करणाऱ्यांना बिलावर सवलत मिळणार, काही हॉटेल, रेस्टॉरंट यांचं आश्वासन


९) कोर्टात आव्हान दिल्यामुळे नागपुरातील जिल्हा परिषदेची निवडणूक वगळली, नागपुरातील जिल्हा परिषदेच्या मतदारसंघांना राज्य सरकारने नगर परिषद, नगर पंचायत घोषित केल्याचा वाद.


१०)  २ हजार जणांविरोधात फौजदारी कारवाई, नगरपालिका निवडणुकीत १० कोटी रुपयांची दारु जप्त, १० हजार जणांना तडीपार