दोन महिन्यात इमानच्या वजनात रेकॉर्डब्रेक घट
इजिप्तवरून आपलं वजन प्रमाणात आणण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या इमाननं आपलं वजन ५० टक्क्यांहून कमी केलंय.
मुंबई : इजिप्तवरून आपलं वजन प्रमाणात आणण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या इमाननं आपलं वजन ५० टक्क्यांहून कमी केलंय.
मुंबईत दाखल झाली तेव्हा 'जगातील सर्वात वजनदार महिला' म्हणून ओळख असलेल्या इमानचं वजन ५०० किलोंहून अधिक होतं. दोन महिन्यात तिनं जवळपास २४२ किलो वजन घटवलंय.
डॉक्टर मुज्जफल लकडवाला यांनी ७ मार्च रोजी इमानवर शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर इमाननं एका महिन्यात आत १३० किलो वजन कमी केलं. यामुळे, इमानच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे.
इजिप्तची नागरिक असलेली इमान ३६ वर्षांची आहे. गेल्या २५ वर्षांपासून ती घराच्या बाहेरही निघाली नव्हती. पण, आता मात्र ती सामान्य आयुष्य जगू शकेल, अशी आशा निर्माण झालीय.